जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जायंट्स ग्रुप ऑफ हिंगोली, विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि सदभाव सेवाभावी संस्थेचा संयुक्त उपक्रम
शहरातील नाकाडे हॉस्पिटल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून शिला देवडा तर प्रमुख पाहुणे म्हणून अंजु देवडा, बंगाळे मॅडम, डॉ. प्रिया नाकाडे, सतीश विडोळकर,किरण लाहोटी यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी सतीश विडोळकर, डॉ प्रिया नाकाडे, बंगाळे मॅडम, किरण लाहोटी, डॉ. नाकाडे, विजय ठाकरे, हर्षवर्धन परसवाळे,रत्नाकर महाजन,डॉ. अभयकुमार भरतीया यांनी समायोचित भाषणे केली. आणि फक्त एकच नाही तर वर्षभर जीवनभर महिला दिन साजरा व्हायला पाहिजे हा सुर निघाला..तसेच व्ही बी एन नर्सिंग स्कुलच्या पूजा पतंगे, सोनाली धवसे, मनीषा डाखोरे, गायत्री वाढवे यांनी महिला दिनाविषयीं आपले मत व्यक्त केले.महिला दिनाचे औचित्य साधून व्ही बी एन नर्सिंग स्कुलच्या विध्यार्थिनींमध्ये महिला दिन याविषयीं निबंध स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये प्रथम पूजा पतंगे तर द्वितीय सुप्रिया थोरात यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले..
पुढील वर्षांपासून संस्थेमार्फत महिलेच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिलेला किंवा संस्थेला किंवा स्वतः ती महिला समाजासाठी उदाहरण असेल अश्या महिलेला *हिरकणी पुरस्कार* ज्याचे स्वरूप 5000₹ शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असेल ते समितीमार्फत जाहीर करण्यात येईल.
कार्यक्रमाला मधुसूदन अग्रवाल, श्यामराव बांगर, रामराव बांगर, दादारावजी शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका पाईकराव, साक्षी मुकाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती कांबळे यांनी केले.. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती कांबळे, सुप्रिया सावळे, गायत्री वाढवे, छाया बरडे, नेहा बनसोडे, प्रतीक्षा जोगदंड, प्रतीक्षा सुतारे, प्रदीप पाईकराव, आकाश साठे, संदीप डाखोरे, वैभव जाधव यांनी प्रयत्न केले..