भारतभरामध्ये,आयुर्वेद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉक्टरांना,त्यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा म्हणून,दर तीन वर्षांनी,मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन पुणे द्वारे, ‘सुश्रुत रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते.
यामध्ये 2024 करिता भारतभरातील आठ डॉक्टरांची निवड करण्यात आली होती.
हिंगोली येथील आयुर्वेद शल्यचिकित्सक डॉ. गजानन धाडवे यांची, मागील 28 वर्षातील, मुळव्याध निवारणासाठी ,शल्य कर्म,अग्नी कर्म,रक्तमोक्षण,क्षारकर्म द्वारे केलेल्या यशस्वी उपचारासाठी व सामाजिक कार्यातील सहभागाची दखल घेऊन ‘सुश्रुत रत्न पुरस्कार’ इस्कॉन कोंडवा,पुणे येथे दि.२७ जानेवारी शनिवार रोजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चे प्रकुलगुरु,डॉ पराग कालकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
.
आयुर्वेद आयकॉन पुरस्कार, पुणे येथील डॉ प्रशांत दौंडकर यांना देण्यात आला.एक्सट्रा ऑर्डीनरी वर्क इन प्रोक्टॉलॉजी करिता, कर्नाटकातील गदग येथील डॉ एम डी सामुद्री व कोल्हापूर येथील डॉ विरधवल पाटील यांना देण्यात आला.
सुश्रुत रत्न पुरस्कार २०२४ हिंगोली येथील डॉ गजानन धाडवे सोबत नागपूर येथील प्रा डॉ शितल असुतकर यांना देण्यात आला.
लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड पुणे येथील सेवानिवृत्त आयुर्वेद उपसंचालक डॉ व्यंकट धर्माधिकारी व बनारस हिंदू विश्वविद्यालयातील डॉ रविशंकर परवझे यांना देण्यात आला.
वरील डॉक्टरांना २७ जानेवारी २०२४ शनिवार रोजी प्रकुलगुरु सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे चे प्रकुलगुरू डॉ पराग कालकर यांच्या हस्ते भोई फाउंडेशन चे डॉ मिलिंद भोई,’मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन’पुणे, चे डॉ कुणाल कामठे आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन पुणे व डॉ कामठे’ज पाईल्स क्लिनिक द्वारे,इस्कॉन कोंडवा, पुणे येथे सन्मानित करण्यात आले.