आपली हिंगोली हरित हिंगोली च्या घोषणा देत पर्यावरणाची सायकल रॅली संपन्न
जी. प्र. दि 14: पर्यवारणाच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी जनजागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली. आपली हिंगोली स्वच्छ हिंगोली, हरित हिंगोली, ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोली च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
येथील छत्रपती शिवाजी चौकातून रॅली निघून छत्रपती अग्रसेन चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवाहर रोड ते पोस्ट ऑफिस रोड मार्गे छत्रपती शिवाजी चौक येथे समापन झाली.यावेळी वृक्ष लागवड आणि संवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, प्रदूषण मुक्त हिंगोली, प्लास्टिक मुक्त हिंगोली आदी विषयावर जनजागृती करण्यात आली..
यावेळी मागील 50 वर्षांपासून सायकल चा नियमित वापर करणारे विश्वासराव नायक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय नाकाडे, डॉ. श्रीधर कंदी,डॉ. राम मुंढे, डॉ. सत्यनारायण तापडिया,डॉ. अमित शाह,डॉ. प्रेमेंद्र बोथरा डॉ. प्रशम दोडल, डॉ कमलेश लाहोटी यांच्यासह रत्नाकर महाजन, ऍड. राजेंद्र अग्रवाल, किरण लाहोटी, मधुसूदन अग्रवाल, प्रा. संदीप लोंढे, बाळू बांगर, डॉ.अभयकुमार भरतीया,विश्वासराव नायक, सूर्यकिरण गौड, गजानन आडे, सुदर्शन महाजन, नंदकिशोर भालेराव, कल्याणकर, जयस्वाल, विजय रामेश्वरे, आकाश रनसिंगे, व्ही. बी. एन. नर्सिंग स्कुलच्या विध्यार्थिनी नगरपरिषद हिंगोलीचे कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. सायकल रॅली चे आयोजन जायँट्स ग्रुप ऑफ हिंगोली, नगरपरिषद हिंगोली, स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, सदभाव सेवाभावी संस्था, योग विद्याधाम, डॉक्टर्स असोसिएशन यांनी केले होते.