एक तास स्वतःसाठी आरोग्यासाठी
सदभाव सेवाभावी संस्थेचा उपक्रम
हिंगोली येथील खटकाळी परिसरातील समर्थ सेवाभावी संस्था द्वारा संचालित राष्ट्रमाता इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात सदभाव सेवाभावी संस्थेचा वतीने एक तास स्वतः साठी आरोग्यासाठी या
कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले..
यावेळी समर्थ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. चाटे,सदभाव चे डॉ अभयकुमार भरतीया, शिक्षक शिरसाट, घोंगडे, मस्के, ठोके मॅडम यांची उपस्थिती होती..
यावेळी योग शिक्षक संकेत अग्रवाल यांनी विध्यार्थ्यांना त्यांच मानसिक आणि शारीरिक आरोग्य कस चांगलं ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले.. तसेच प्रत्यक्ष योगाचे आसन,प्राणायाम, मुद्रा याचे काही प्रयोग केले.विध्यार्थ्यांकडून करवूनही घेतले. तन मन जर सुदृढ असेल तर जीवनात यशाची हमी असते. मन एकाग्र असेल तर अभ्यासात आणि परीक्षेत हमखास यश मिळतेच.प्रत्येकाने स्वतः साठी आरोग्यासाठी मग ते मानसिक असो वा शारीरिक एक तास दिवसभरातून काढलाच पाहिजे हा या कार्यक्रमचा उद्देश असल्याच सदभाव चे डॉ अभयकुमार भरतीया यांनी आपल्या प्रस्ताविकेत सांगितले.
यावेळी शाळेतील कर्मचारी विध्यार्थी यांची उपस्थिती होती..