Swagat Samachar News

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद  

ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित कवी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

हिंगोली  दि. 09 : आज ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रामध्ये नवोदित कवींचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनात नवोदित कवींनी सामाजिक, शैक्षणिक, गेय तसेच राजकीय विडंबन विषयक कवितांचे सादरीकरण केले. या कवि समेंलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

येथील कै. रं.रा.बियाणी नूतन साहित्य मंदिर वाचनालयात आयोजित हिंगोली ग्रंथोत्सव-2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात विजय वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी ग्रंथालय सहायक संचालक सुनिल हुसे, प्रा. विलास वैद्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या कवी संमेलनात प्रा. विलास वैद्य यांनी माझ्या प्रयोगशील देशात, अनिकेत देशमुख यांनी बापू, शिवाजी कऱ्हाळे यांनी शेजकऱ्यांचे जीणं, कलानंद जाधव यांनी गोड जेवण, रतन आडे यांनी उखाणे, श्रीराम कऱ्हाळे यांनी बरसात, सिंधूताई दहिफळे यांनी कुणबी, पांडूरंग गिरी यांनी बाल कविता, राजाभाऊ बनसकर, शिल्पा कांबळे यांनी स्त्री शक्ती, नरेंद्र नाईक यांनी रडता रडता रडून गेला, डॉ. प्रेमचंद्र बोथरा यांनी तुला विसरण्या पुरता, हर्षवर्धन परसावळे यांनी पळसखेडचे गाणे, शिलवंत वाढवे यांनी लेकरा, डॉ. संजय नाकाडे यांनी दु:खाचा डोंगर, सुमन दुबे गझल, अर्चना मेटे, डॉ. संगीता काबरा यांनी सांग सांग भोला नाथ, सुनिल हुसे यांनी सर्वधर्म, श्रीनिवास मस्के यांनी पोरी, प्रभाकर जाधव यांनी घामाने भिजलेलं अंग, राजकुमार मोरगे यांनी वाटेत चालतांना ही कविता सादर केली. तसेच टी.एम. सय्यद, अहिल्या पतंगे, डॉ.राधिका देशमुख, अरुण हरण, बाहेती यांनीही आपल्या कविता सादर केल्या. 

या कवि संमेलनाचा अध्यक्षीय समारोप विजय वाकडे यांनी केले. प्रास्ताविक अशोक अर्धापूरकर यांनी केले, तर शेवटी आभार मिलींद सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष ससे, संतोष सामाले, रामेश्वर गांजने, लक्ष्मण लाड यांनी परिश्रम घेतले. या कवी संमेलनास जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, ग्रंथपाल, शिक्षक, विद्यार्थी, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *