आज दिनांक 17-02-2024 रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे हिंगोली शहरातील मातंग समाजबांधव यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या सशस्त्र क्रांतीचे जनक,आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बहुजन भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.व्यंकटेश कसबे, माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे, सेवानिवृत्त विधीतज्ञ खिल्लारे साहेब, रिपाई उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, अनिल खडसे जिल्हाध्यक्ष बभाप, संदेश शिखरे जिल्हाध्यक्ष लशसे, सुमित कांबळे सामाजिक कार्यकर्ते, विशाल खंदारे, विष्णू हनवते, डी आर हनवते, ब्रम्हा हनवते, विजय सोनुने, प्रदीप आठवले, नारायण सोनटक्के, सुरेष वाव्हळे, रामराव आठवले, सचिन करडे, रितेश हनवते, अनिल गालफाडे, सतीश आठवले, मॉन्टी आठवले, महिला आघाडीच्या द्रौपदाताई शिखरे, कुसुमताई हनवते, आशाताई खिल्लारे यांची उपस्थिती होती.