प्रतिक फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आला वृक्षांचा वाढदिवस
झाडे लावा झाडे जगवा चा डॉ लखमावार यांच्या कडून संदेश
हिंगोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉ किशन लखमावार हे प्रतिक फाऊंडेशन च्या वतीने मागिल अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये एक वर्षा पुर्वी नाईक नगर परिसरात डॉ. लखमावार यांनी झाडं लावली होती. या वृक्षाचे संवर्धन करून वृक्षांची काळजी त्यांनी एक वर्ष घेतली. वृक्ष लावने आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याचा संदेश डॉ. किशन लखमावार यांनी नागरिकांना दिला आहे. आज प्रतिक फाऊंडेशन च्या वतीने रविवारी झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ज्योत्स्ना लखमावार यांनी झांडांना ओवाळून औक्षण क् केले. यावेळी ऊद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते ओम नैनवानी, पर्यावरण प्रेमी डॉ. अभयकुमार भरतीया यांच्या सह सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना डॉ किशन लखमावार यांनी सांगितले की, झाडामुळे आपल्याला ऑक्सीजन मिळते. कोरोना काळात ऑक्सीजनची काय गरज आहे हे आपणास कळाले. त्यामुळं वड, पिंपळ, कडुनिंब यासारखी पर्यावरण पूरक झाडे सर्वांनी लाऊन त्याची जोपासना करावी असे आवाहन डॉ किसन लखमावार यांनी केली आहे.